शेतकऱ्यांना दर्जेदार खते व औषधे मिळण्यासाठीच अनगरला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा डेपो : राजन पाटील
अनगरला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या औषध व खते डेपोचे उदघाटन
मोहोळ ( शहर प्रतिनिधी ) - महाराष्ट्र राज्य द्राक्षे बागायतदार संघ पुणे यांना साठ वर्षाची परंपरा आहे. या संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार खते आणि औषधे रास्त किमतीमध्ये पुरवण्याचे काम केले जाते. मोहोळ,माढा आणि बार्शी या तालुक्याच्या सोयीसाठी अनगर येथे द्राक्ष संघाच्या औषध व खाते यांच्या डेपोचे उद्घाटन करण्यात आले अनगर परिसरांमध्ये एक हजार एकर पेक्षा जास्त नवीन द्राक्षाची लागवड झाली असून द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून शेतकऱ्याची नेमकी अडचण लक्षात घेऊन दर्जेदार खते आणि औषधे हे रास्त किमतीत मिळतील यामुळे हजारो शेतकऱ्यांची सोय झाली उसाच्या शेती बरोबर द्राक्षाची शेती करून आर्थिक उन्नती होईल. या डेपोमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे मत माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर येथे व्यक्त केले.
अनगरचे सरपंच अंकुश गुंड यांनी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे यांच्या माध्यमातून सोलापूर विभागासाठी खते व औषधे विक्री साठी डेपोची स्थापना केली आहे. याचे उदघाटन माजी आमदार राजन पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य द्राक्षे बागायतदार संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव पवार यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तानाजी गुंड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी सोलापूर जिल्हा द्राक्षे बागायतदार संघाचे अध्यक्ष आशिष काळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार राजन पाटील महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव पवार, जिल्हा अध्यक्ष आशीष काळे, सचिव लालासाहेब देशमुख, विलास मोरे ,काशिनाथ अवताडे,प्रमोद बाबर, भैय्या शेख, सरलेश लिगडे, बाळासाहेब दातीर हे द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक त्याचबरोबर विखे पाटील लोकनेतेचे माजी चेअरमन हनुमंत पोटरे सुनील घाटुळे, मुरलीधर गुंड, नरहरी गुंड ,धनाजी गुंड, आबासाहेब शिंदे, अर्जुन माने, भिवा जाधव, मनोहर जाधव सिध्दू माने, आदी द्राक्षे बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दाजी गुंड यांनी आभार मानले.
कमी पाण्यावर आणि कमी खर्चावर किफायतशीर द्राक्ष शेती कशी करावी. यासाठी संघाकडून दर्जेदार खते व औषधे पुरवली जातील. सहाजिकच या खाता आणि औषधामुळे बाजारपेठेतील औषध खतांच्या किमतीवर नियंत्रण मिळेल. गरजेचीच खते द्राक्षे पिकाला मिळावी यासाठी संघाकडून एका लॅबची उभारणी करण्यात येईल .सबसरफेस मुळे पाण्याची बचत व उत्पादन वाढते. स्प्रे करण्यासाठी उत्तम साधने वापरली, खताची व औषधाची मात्रा योग्य दिली तर शेतीमधून भरघोस उत्पन येईल. शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी संघ नेहमीच तयार आहे -- (शिवाजीराव पवार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ)
0 Comments