Hot Posts

6/recent/ticker-posts

संकटाच्या काळात शेतकर्‍यांच्या मदतीला धावून येणारा शिवसेना पक्ष: -संजय (काका) देशमुख

 संकटाच्या काळात शेतकर्‍यांच्या मदतीला धावून येणारा शिवसेना पक्ष: - संजय (काका) देशमुख



               मोहोळ (क. वृ)  :- मोहोळ तालुक्यातील अनेक शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले या शेतकऱ्यांना शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरघोस मदत केली असून येत्या दोन दिवसात त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आतिकृष्टीने बाधीत झालेले पंचनामे पासबुक आधार कार्ड सातबारा उतारा व झालेल्या नुकसानीची माहीती त्वरीत देण्यात यावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका संघटक संजय उर्फ काकासाहेब देशमुख यांनी केले आहे मोहोळ तालुक्यातील सीना भीमा नागझरी या नदीला तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि  गावे गावे पाण्यामध्ये वेढली गेली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामध्ये पिकांची नासाडी झाली पिके वाहून गेली  जमिनीतील माती वाहून गेली बांध फुटले त्याच बरोबर विजेचे खांब तुटले शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली शेतकऱ्यांच्या  घरातील सर्व साहित्य पावसाने पुर्णपणे नष्ट झाले त्यामुळे पिके लावण्या साठी ठेवलेली बिबियाणे व इतर सर्व  आलेले धान्य हे सर्व भिजून नष्ट झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी किमान चार ते पाच वर्ष आर्थीक संकटातुन बाहेर येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे त्यासाठी सतत होणाऱ्या नुकसानी मुळे शेतकरी खचून जाऊ नये म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनीराज्यातील शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे त्याचे पैसे सोलापूर जिल्ह्याला प्राप्त झाले असून त्याचे वाटप या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येत्या सोमवार पासून त्यांच्या खात्यावर होणार आहे ती मदत जाहीर करून ती जमा करण्याचे काम सुरू होणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे आधार कार्ड देण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुका संघटक काकासाहेब देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना केले
Reactions

Post a Comment

0 Comments