महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविल्या; झोनल सचिव राकले मोहोळमध्ये कार्यआढावा बैठक संपन्न
मोहोळ (क.वृ ) : - महाराष्ट्र वीज कामगार महासंघ म्हणजे तळागळातील वीज कामगारांचे आशास्थान असलेली महाराष्ट्राच्या विद्युत क्षेत्रातील एकमेव कामगार संघटना आहे. २५ डिसेंबर १९६३ पासून आजपर्यंत सतत वाढणारी व सर्व संवर्गाचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव संघटना म्हणून वीज कामगार महासंघाकडे पाहिले जाते.महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने सुरुवातीपासूनच कर्मचारी बांधवांच्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे सातत्याने प्रयत्न केला आहे. असे गौरवोदगार महाराष्ट्र वीज महासंघाचे झोनल सचिव विजयकुमार राकले यांनी काढले.
मोहोळ येथील महावितरण कार्यालयाच्या समोर महाराष्ट्र विज महासंघाच्या वार्ताफलक आणि नामफलकाचे अनावरण आणि राज्य कामगार महासंघ
कार्यआढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महासंघाच्या प्रमुख पाहुणे आणि सभासदांसमोर मार्गदर्शन करताना झोनल सचिव विजयकुमार राकले बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी मोहोळचे महावितरण उपकार्यकारी अभियंता हेमंत ताकपेरे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण फीत कापून करण्यात आले.
यावेळी विविध मान्यवरांनी वीज कामगार महासंघाचा वाटचालीचा आढावा विषद केला. राष्ट्रहित, उद्योग हित आणि कामगार हित ह्या त्रिसूत्रीचा अवलंब करणाऱ्या देशातील क्रमांक १ च्या भारतीय मजदूर संघाला संलग्न असणारी ही वैभवशाली कारकीर्दीचा इतिहास असणारी संघटना आहे असे गौरवोदगार यावेळी महाराष्ट्र वीज कामगार महासंघ निवृत्त संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यशवंत बुऱ्हाडे यांनी काढले.
यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हेमंत ताकपेरे, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ झोनल सचिव विजयकुमार राकले,सर्कल सचिव संजय जाधव, अध्यक्ष सुनील गायकवाड ,विक्रम गायकवाड, महेश धर्माधिकारी,लक्ष्मण ऐवळे, रोहिदास माने ,परशुराम व्हनचेंजे, अर्जूनसिंग चव्हाण, पंकज सुतार ,निलेश गायकवाड,तानाजी नाईकवाडी इत्यादी सह महावितरणचे विविध अधिकारी आणि कामगार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments