33 नवीन विहिरींना 99 लाख निधी पंचायत समितीला प्राप्त- साठे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 9, 2020

33 नवीन विहिरींना 99 लाख निधी पंचायत समितीला प्राप्त- साठे

 33 नवीन विहिरींना 99 लाख निधी पंचायत समितीला प्राप्त- साठे

    अकलूज( ) शासनाच्या अहिल्या सिंचन विहिर योजनेतून नवीन 33 विहिरींना प्रशाकीय मंजूरी मिळाली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्रातील शेतकरयांचे जीवनमान उंचावे या उदात्त हेतुने शेती व्यवसायाला जोड धंदा व पशू जोपासणेसाठी  महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत सन 2020,21 अंतर्गत जनावरांचा गोठा बांधणे ( शेड) यासाठी माळशिरस तालुक्यातील 30 गाय गोटयांना मंजुरी मिळाली आहे. 
    अहिल्या सिंचन विहिर योजना 33 लाभाथ्याॅना तीन लाख रूपये प्रमाणे  99 लाख रूपये मंजूर झाले आहेत तर जनावरांचा गोठा बांधणे या योजनेसाठी 30 लाभाथ्याॅना 70 हजार रूपये प्रमाणे 21 लाख रुपयांचा निधी माळशिरस पंचायत समिती कडे आला आहे.यावेळी गणपतराव वाघमोडे,  हनुमंत पाटील  , बिनू पाटील,  राहूल ( बापू वाघमोडे ) , विष्णू घाडगे , रामचंद्र माने मानसिंग मोहिते,  सचिन रणनवरे , सावता ढोपे , केशव कदम , बाळासाहेब कदम ,तानाजी पालवे आदि उपस्थितीत होते. या योजनेच्या निधीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,  आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,  आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मंजूर झाला असल्याचे माळशिरस पंचायत समितीचे सभापती शोभाताई साठे व उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages