छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास दिपक ऊर्फ गुंडा दादा खटकाळे यांनी दिली एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी
सांगोला शहर आणि तालुक्यातील विविध सामाजिक क्षेत्रात आपण नेहमीच सहभागी होत असतो.छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आदर्श राजे होते. या आदर्श राजांच्या पुतळा उभारणीच्या कार्यास सांगोला शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी सढळ हातांनी मदत करावी,असे आवाहन ही दिपक ऊर्फ गुंडा (दादा) खटकाळे यांनी केले आहे.
सांगोला (जगन्नाथ साठे ): युवा सेनेचे तालुका अध्यक्ष,तथा सांगोला तालुक्यातील युवकांचे आशास्थान दिपक उर्फ गुंडा दादा खटकाळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आणि इतर युवकांना प्रेरणा मिळावी,यासाठी सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कार्यास एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी देवून सामाजिक क्षेत्रात नवा आदर्श घालून दिला.त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सांगोला तालुक्यात सामाजिक क्षेत्रातील कार्यास दिपक ऊर्फ गुंडा(दादा) खटकाळे नेहमीच हिरीरीने सहभागी होत असतात.तालुक्यातील युवकांची भली मोठी फौज त्यांच्या पाठीशी आहे.विशेष म्हणजे तालुक्यातील युवकांमध्ये त्यांची क्रेझ आहे.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मित्र परिवाराने वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, आदि कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी गुंडा खटकाळे यांनी सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कार्यास एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी दिली आहे. एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश दिपक ऊर्फ गुंडा दादा खटकाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीकडे सुपूर्त केला. यावेळी शिवप्रेमी उपस्थित होते.
0 Comments