Hot Posts

6/recent/ticker-posts

अवैध धंदे बंद करण्यासाठी वंदे मातरम् सेना व भाजपाच्यावतीने सुरु असलेले उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच ; मागण्या मान्य होईपर्यंत लढण्याचा उपोषणकर्त्यांचा ठाम निर्धार

अवैध धंदे बंद करण्यासाठी वंदे मातरम् सेना व भाजपाच्यावतीने सुरु असलेले उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच ; मागण्या मान्य होईपर्यंत लढण्याचा उपोषणकर्त्यांचा ठाम निर्धार



    करमाळा( क.वृ.) ;- करमाळा तालुक्यात जोमात सुरू असलेले  अवैध धंदे बंद व्हावेत व पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल होणे बंद व्हावे या मागणीसाठी करमा तालुका भाजप  तसेच वंदे मातरम शक्ती सेना  यांच्या  वतीने सुरू असलेले आमरण उपोषण  आज  दिनांक  9 नोव्हेंबर रोजी चौथ्या दिवशीही  सुरू होते  मागण्या मान्य होत नाहीत  तोपर्यंत  लढण्याचा  निर्धार उपोषणकर्त्यांनी  व्यक्त केला  आहे .

     यावेळेस उपोषणकर्ते सुहास घोलप व भाजपचे गणेश चिवटे, दिनेश माळवे यांनी बोलताना सांगितले की, करमाळा तालुक्यात मटका ,गुटखा, वाळू ,जुगार, चक्री, मावा ,बनावट दारू, बेकायदेशीर लॉजिंग, वेश्याव्यवसाय आदी सर्व बेकायदेशीर अवैध धंदे जोमाने सुरू असून काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सदर धंदे करणाऱ्या लोकांना वरदहस्त असून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करून माया गोळा केली जात आहे. त्याच बरोबर करमाळा पोलीस ठाणे येथे आर्थिक प्राप्ती करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणही वाढले आहे, तसेच सर्वसामान्य जनतेस पोलीस ठाण्यात गेले असता लज्जास्पद ,अपमानास्पद वागणूक देऊन धमकिवजा भाषा वापरली जाते त्याच बरोबर या त्यांच्या अन्यायाबद्दल आवाज उठवला असता असे धंदे करणाऱ्यांकडून दमबाजी, जिवे मारण्याची धमकी दिली जाते .तसेच अधिकाऱ्यांकडून कायद्यांच्या बडगा दाखवून कोणत्याहि खोट्या गुन्हात अडकवून त्रास दिला जाईल,धिंड काढली जाईल मारहाण केली जाईल ,अशी धमकी दिली जात असल्याचे बोलले जाते.
                सदर सर्व प्रकाराची सखोल चौकशी होऊन धंदे करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी तसेच त्यांना पाठीशी घालणारे व धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कारवाई करून कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते,नागरिक नेटाने सुरू ठेवतील.
         उपोषणादरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले की कार्यकर्ता चिखलाचा नसून पूर्ण हयात कार्यकर्ता तयार करण्यास जाते त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पाठीशी आहोत त्यांनी कोणालाही भिण्याचे कारण नाही. या उपोषणास पूर्ण पाठिंबा असून त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही लढा देऊ. यावेळी भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माढा  युवक अध्यक्ष जयसिंग ढवळे, माजी सभापती शेखर गाडे, जिल्हा परिषद सदस्य बिभीशन आवटे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश चिवटे, माजी शहरप्रमुख संजय शीलवंत,आदिनाथ चे संचालक आशिष गायकवाड, महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन अफसर जाधव, बाजार समितीचे माजी संचालक देवानंद  बागल, ग्राहक पंचायतचे भालचंद्र पाठक, मनसेचे विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष सतीश फंड, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, नगरसेवक अतुल फंड, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन चवरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष भैया गोसावी,राष्ट्रीय मानव अधिकारचे राज्य संपर्क प्रमुख श्यामराव ननवरे, स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, युवा तालुकाअध्यक्ष अमोल घुमरे, सोगावचे सरपंच राहुल घनवट, चिखलठाणचे उपसरपंच दादा सरडे, करमाळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नितीन घोडेगावकर करंजे गावचे उपसरपंच सचिन सरडे, ब्राह्मण संघाचे तालुकाध्यक्ष संजय कुलकर्णी,  भाजपाचेप्रदेश कार्यकारणी सदस्य विठ्ठलराव भणगे, जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन, विस्तारक भगवान गिरी गोसावी, माजी तालुका सरचिटणीस बाळासाहेब कुंभार, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवक अध्यक्ष सचिन गायकवाड, ओबीसी सेलचे धर्मराज नाळे, किसान मोर्चाचे विजय नागवडे, महिला जिल्हाचिटणीस राजश्री खाडे, महिला अध्यक्ष अश्विनी भालेराव, ओबीसी सेल अध्यक्ष चंपावती कांबळे, माजी महिला अध्यक्ष भाग्यश्री कुलकर्णी ,वंदेमातरम शक्तीसेनेचे गणेश माने, सिकंदर तांबोळी, संजय तेली, प्रसाद माने, सौदागर फलफले, जयसिंग सातपुते, अनिल शिंदे, दशरथ घोलप ,हनुमंत साने तसेच करमाळा तालुक्यातील शेकडो नागरिक व पदाधिकारी यांनी  उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments