Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी रहाणीमान भत्ता फरक द्या - दिलीप जाधव

 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी रहाणीमान भत्ता फरक द्या - दिलीप जाधव



मोहोळ (क.वृ):- मोहोळ तालुक्यात ९४ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीमध्ये विविध पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १७२ इतकी असून कोरोना  विषाणूचा प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायतीची ची वसुली झालेली नाही . कोरोना  कोरोना रोखण्यासाठी गाव पातळीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे परंतु एकीकडे मात्र शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत . परंतु या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मोहोळ तालुक्यात प्रभावीपणे राबवली जात नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे .म्हणून मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मोरे यांना ग्रामपंचायत कर्मचारी युनियच्यावतीने लेखी निवेदन देण्यात आले .या दिलेल्या निवेदनामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी थकित रहाणीमान भत्ता रकमेतून दहा ते पंधरा हजार रुपये देण्यात यावेत .एप्रिल २०१८ पासून अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रा . फंडाच्या रकमा ग्रामपंचायतीने प्रा.फंड खात्यावर भरणा केलेल्या नाहीत या रकमा तात्काळ भरण्यात याव्यात .
तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाने 10 ऑगस्ट 2020 रोजी लागू केलेल्या सुधारित दराप्रमाणे किमान वेतन मिळावे .ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा काढण्यात यावा .कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील जाहीर केले प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा .तसेच वडदेगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी श्री भारत आठवले यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले असून कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी बाबत चौकशी करून ग्रामसेवक आर जे सय्यद यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच मोहोळ तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी बाबत संपूर्ण ग्रामपंचायत निहाय तपासणी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे  जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांच्या हस्ते देण्यात आले .यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य धनाजी पांढरे तालुका अध्यक्ष छाया लोंढे सचिव संतोष गायकवाड प्रशांत पाटोळे संजय मोरे  बंडु चंदनशिवे युवराज नरुटे सोमा नरके  कुलाल इ. कर्मचारी उपस्थीत होते .
Reactions

Post a Comment

0 Comments