सेंद्रिय शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशोक शिंदे यांचा सन्मान
करमाळा ( क. वृ.):- आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून अनेक शेतकऱ्यांना लखपती बनवणाऱ्या तसेच अल्पावधीतच नर्सरी व्यवसायात नावलौकिक मिळवलेल्या अशोक शिंदे यांचा करमाळा तालुका मराठा सेवा संघाकडून त्यांचा वाढदिवसानिमित्त विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना मराठा सेवा संघ तालुका सचिव सचिन शिंदे म्हणाले की, अशोक शिंदे यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल आर के फौंडेशन कडून मिरची पिकातील भरघोस उत्पादनाबद्दल कृषी क्रांती प्रयोगशील शेतकरी, नाशिक येथील कृषिथॉन संस्थेचा आदर्श शेतकरी पुरस्कार, 2018 साली सोलापूर जिल्हा कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाअंतर्गत उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी पुरस्कार आदी पुरस्करांनी त्यांना गौरविण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य शेतकरी समृद्ध झाले आहेत. अशोक शिंदे यांच्यासारख्या कृषिनिष्ठ मार्गदर्शकाची गरज असून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कृतिशील कार्यक्रम राबवणार आहोत. ज्या माध्यमातून कमीत कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन मिळवता येईल.
यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,निलेश मिरगे,पवन नागटिळक,संतोष जगदाळे,अमर नागटिळक, अशोक मिरगे, दीपक वारे, जीवन धुमाळ , रघुनाथ जाधव, विलास रोडगे , ऋतुराज पाटील ,वैभव शिंदे, शुभम नर्सरी टेम्भुर्णी चे संचालक दादासाहेब रेडे पाटील, अमोल करडे, आदी उपस्थित होते.
सरकारला उत्तर देताना अशोक शिंदे म्हणाले की, रासायनिक खतांच्या बसू वापरामुळे जमिनीची उत्पादकक्षमता कमी होत असून शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी आपण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी आपण अविरतपणे काम करणार आहोत. भविष्यात आपण असेच मार्गदर्शन करणार असून शेतकऱ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अतुल वारे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments