Hot Posts

6/recent/ticker-posts

संग्राम देशमुखांना सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देणार- आ. सुभाष देशमुख

 संग्राम देशमुखांना सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देणार- आ. सुभाष देशमुख


सोलापूर (क.वृ):- पुणे पदवीधर मतदार संघाची भाजपची उमेदवारी संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर होताच आ. सुभाष देशमुख यांनी सोलापूरहून सांगलीला येऊन त्यांची भेट घेतत पदवीधर निवडणुकीत सर्वोतोपरी मदत करणार असून सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचे त्यांनी असल्याचे सांगितले. 1 डिसेंबर रोजी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे.  भाजपकडून सांगलीचे संग्रामसिंह देशमुख यांचे नाव सोमवारी जाहीर करण्यात आले.  त्यानंतर तातडीने आ. सुभाष देशमुख यांनी सांगली दौरा करत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांशी चर्चा करून संग्राम देशमुख निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी त्यांनी यावेळी घेतली. यावेळी अविनाश महागावकर, मिलिंद कोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments