जिल्हा परिषदेचे नवे सीईओ स्वामी
राज्यशासनाने राज्यभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जाहीर केले आहे त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान प्रकाश वायचळ यांची बदली झाली तर नवीन दिलीप स्वामी हे बदलून आले आहेत. सध्या ते नाशिक विभागात महसूल उपजिल्हाधिकारी पदी कार्यरत आहेत. प्रमोशन घेऊन ते सोलापूर जिल्हा जि.प.चे सिईओ म्हणून रुजू होत आहेत. लवकर ते या पदाचा पदभार हाती घेतील. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील तोंडार ता. उदगीर येथील असून आजपर्यंत त्यांनी विविध ठिकाणी धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आता सोलापुरात कशा पद्धतीने त्यांची कामगिरी होती याकडे सोलापूरकरांची लक्ष लागून राहिले आहे.
0 Comments