शहर जिल्हा महिला काॅग्रेस कमिटीच्या वतीने डाॅ.आप्पासाहेब बगले
सोलापूर (क.वृ.):- कोविड-१९ (कोरोना व्हायरस) महामारिने सोलापुरसह भारतदेश,जगभर थैमान घातले. आरोग्याच्या संकट काळातही निर्भयतेने जिव धोक्यांत घालून सोलापुर शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राहुल गांधी विचार मंचचे कार्यध्यक्ष डाॅ.आप्पासाहेब बगले हे वैद्यकिय सेवा गेल्या सहा महिन्यांपासून बजावित आहेत असे डाॅ.आप्पासाहेब बगले यांचा सोलापूर शहर जिल्हा महिला काॅग्रेसच्या वतीने महिला अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांनी शाल,श्रीफल व पुष्पहार घालून सत्कार करुन सन्मानित केले. यावेळी डाॅ.बगले यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव करताना आम्हास अभिमान वाटतो असे उद्गगार हेमाताईने काढले व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रमिला तुपलवंडे,अॅड. करिमुन्नीसा बागवान,बाबुलाल जाधव,संजयकुमार शिवशरण,दयानंद ईकळगी आदि उपस्थित होते.
0 Comments