बार्शीत नगर पालिकेच्या वतीने माझे कुटूंब - माझी जबाबदारी अभियान सुरु

बार्शी दि.१०(क.वृ.):- महाराष्ट्र शासनाच्या "माझे कुटुंब-माझी जबाबदारी" या मोहिमेअंतर्गत बार्शी शहरातील कोमॉर्बिड व्यक्तींची रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट प्रत्येक प्रभागामध्ये होम टू होम करण्याचे नियोजन बार्शी नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे. या मोहिमेचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक विलास रेणके व मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील 20 प्रभागातील एकूण 10,000 कोमॉर्बिड व्यक्तींची रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. तरी या मोहिमेचा वय वर्ष 60 व त्यापुढील व्यक्तींनी तसेच मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनी आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा इत्यादी आजार असणाऱ्या व्यक्तींनी व सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन बार्शी नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमास मुख्य लेखापाल मिनाक्षी वाकडे, विद्युत उपनगर अभियंता अविनाश शिंदे, वॉर्ड ऑफिसर दत्ता कांबळे, स्वच्छता निरीक्षक हर्षल पवार, बाळासाहेब गुंड, तुषार खडके व नगरपरिषद कर्मचारी तसेच या भागातील आशा वर्कर, बंडू माने, ललित बस्ताद, बबन नायकोजी हे उपस्थित होते.
0 Comments