Hot Posts

6/recent/ticker-posts

अप्रूपा नदीवर पूल बांधून मिळावा आलेगाव ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी

अप्रूपा नदीवर पूल बांधून मिळावा आलेगाव ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी

सांगोला दि.१०(क.वृ.): तालुक्यातील आलेगाव गावठाण मधून दिवसे वस्ती कडे जाणारा रस्ता हा नदीपात्र मधून जात असल्याने नदीपात्रात पाणी आल्यावर आलेगाव गावठाण व दिवसे वस्ती यांचा एकमेकांशी संपर्क पूर्णपणे तुटून नागरिकांची तारांबळ उडत असल्याने आलेगाव अप्रुपा नदीवर पुल बांधून द्यावा असे आलेगाव ग्रामस्थांच्यावतीने  लेखी निवेदन देण्यात आले आहे.

आलेगाव येथून दिवसे वस्ती कडे जाणारा रस्ता हा डांबरी रस्ता असून सदरचा रस्ता हा अप्रोका नदी पात्रामधून जात असल्याने ज्या वेळी नदीपात्रामध्ये दुथडी पाणी भरून वाहत असते त्यावेळी नदी पत्रांमधून दिवसे वस्तीकडे जाणे अशक्य होत असते. दिवसे  वस्तीकडे जाण्यासाठी आफृका नदी पत्रावर पूल नसल्याने वाहने तसेच चालत जाणार्‍या नागरिकांना मोठ्याप्रमाणावर कसरत करावी लागते. शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी तसेच पशुपालन हे दूध घालण्यासाठी आलेगाव गावठाण येथे जात असल्याने ज्यावेळी नदीपात्रामध्ये पाणी येते त्यावेळी दिवसे वस्ती व आलेगाव गावठाण संपर्क पूर्णपणे तुटल्याने शैक्षणिक, व्यावसायिक असे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असते. त्यामुळे आलेगाव या ठिकाणी नदीपात्रात पूल बांधण्यात यावा या मागणीसाठी दिवसे वस्ती ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.  सदर निवेदन देतेवेळी पांडुरंग दिवसे, राजाराम दिवसे, श्रीकृष्ण दिवसे, नारायण दिवसे , समाधान दिवसे, संतोष दिवसे,  संजय दिवसे, सुरेश राऊत आदी नागरिक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments