Hot Posts

6/recent/ticker-posts

हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळाने दिले पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन

 हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ डॉ आंबेडकर जयंती उत्सव मंडळाने दिले पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन


सांगोला दि.६(क.वृ.): पुरोगामी भारतामध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हा येथील मनिषा वाल्मिकी या तरुणीचा सामुहिक बलात्कार व निघृण हत्याप्रकरणी बलात्कारी व खूनी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक राजेश गवळी आणि नायब तहसिलदार किशोर बडवे यांना दिले.

या निवेदनात असे म्हटले आहे की आम्ही भिमनगरमधील सर्व समाज बांधव व तमाम सांगोला तालुक्यातील बहुजन बांधव यांच्यावतीने पुरोगामीभारतामध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हा येथील मनिषा वाल्मिकी या तरुणीचा सामुहिक बलात्कार करुन तीची जीभ कापून व मान, मणक्याचे हाड मोडून क्रूरपणे हत्या करण्यात आली. तसेच उत्तर प्रदेश पोलीसांकडून दडपशाहीची भूमिका घेत मध्यरात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करणे हे भारतासारख्या लोकशाही देशाला न शोभणारे कृत्य असून, समस्त बहुजन बांधवांसाठी चीड व संताप वाढवणारा हा प्रकार आहे. अशा जातीयवादी विचार सरणीचा व नीच कृत्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व समस्त समाज बांधव तिव्र निषेध करत आहोत,अपराध करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी,अशी मागणी या निवेदनातून केली आहे. 

यावेळी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉ आयु.प्रकाश बनसोडे,आयु.तानाजी बनसोडे,खजिनदार आयु.  आनंदा बनसोडे,खजिनदार आयु सीताराम बनसोडे, आयु.किसन बनसोडे सेक्रेटरी, लोकहितवर्धक आयु. चंद्रकांत काटे, पँथर ग्रुपचे अध्यक्ष आयु.प्रवीण बनसोडे, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments