हाथरस घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी - बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिले तहसीलदारांना निवेदन

सांगोला दि.६(क.वृ.): हाथरस, उत्तर प्रदेश येथे मनिषा वाल्मिकी या युवतीवर व बलरामपुर येथील दलित विद्यार्थीनींवर अन्याय ,अत्याचार व, बलात्कार करणाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी,यासाठी बहुजन समाजपार्टी सोलापूर जिल्हा व सांगोला विधानसभा युनिटतर्फे नायब तहसिलदार किशोर बडवे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाच्या माध्यमातून असे सूचित केले की,हाथरस येथील दलित भगीनी मनिषा वाल्मिकी या युवतीवर तेथील ठाकुर समाजातील नराधमाने अन्याय अत्याचार करून बलात्कार केला.त्यानंतर तेथील डि.एम., पोलीस प्रशासन यांनी मनिषाताई हीच्या कुटुंबांना त्यांचे घरामध्ये कोंडून रात्री २.३० वा. जता भुतगडी या गांवी प्रशासनाने तिचा अंत्यसंस्कार करून कुटुंबाचा मुलीचा अंत्यसंस्कार करणेचा हक्कापासून वंचित ठेवले.तसेच तेथील डि.एम. ने पिडीत कुटुंबास धमक्या दिल्या. अशा पध्दतीने मयत मनिषा व तिच्या कुटुंबावर तेथील ठाकुर समाजातील नराधम व जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी संगनमताने मिळून अन्याय केलेला आहे. तसेच बलरामपूर येथील आमची दलित भगीनी विद्यार्थीनी हीचेवरसुध्दा तेथील नराधमाने अन्याय अत्याचार करून बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.
वर नमुद दोन्ही घटनांचा बसपा सांगोला विधानसभा युनिटतर्फे तीव्र शब्दात निषेद व्यक्त करून विविध मागण्या केल्या आहेत, त्यामध्ये मा. राष्ट्रपती महोदय यांनी वर नमुद प्रकरणात लक्ष घालुन तात्काळ कारवाईचे आदेश द्यावेत.
वर नमुद प्रकरणांची भा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिशामार्फत चौकशी होवून संबंधीत डि.एम., संबंधीत पोलीस प्रशासनातील अधिकारी व आरोपी यांचेविरूध्द कारवाई करणेत यावी तसेच जलदगती न्यायालयामध्ये जलदगतीने निर्णय घेवून नराधमांना फाशी द्यावी. हाथरसचे डि.एम. यांचेवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, उत्तर प्रदेश सरकार तात्काळ बरखास्त करावे, असे ही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मिलींद बनसोडे, विधानसभा अध्यक्ष ॲड. सागर बनसोडे, प्रभारी विश्वास मोरे,कोषाध्यक्ष अविनाश सुर्यागण, अमर सोनवले,शहर अध्यक्ष,संदीप बनसोडे, उपाध्यक्ष रामचंद्र बनसोडे, कोषध्यक्ष अजित बनसोडे, आण्णा काटे, राजू माने आदि पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments