हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेच्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यात यावी - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगोला तहसीलदारांना दिले निवेदन

सांगोला दि.६(क.वृ.): उत्तरप्रदेश येथील सामुहिक बलात्कार प्रकरणी गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी,यासाठी वंचित बहुजन आघाडी, सांगोला यांचेवतीने आज मंगळवारी नायब तहसिलदार किशोर बडवे यांना निवेदन देण्यात आले.
उत्तरप्रदेशातील हाथरस येथे दि. १४ सप्टेंबर २०२० रोजी एका २० वर्षीय दलित तरूणी कु.मनिषा वाल्मिकी हिच्यावर त्याच गावातील नराधम गुन्हेगारांनी सामुहिक बलात्कार करून तिच्या शरीराची अवहेलना केली आहे. या निंदनीय कृत्यास व सदर पीडित तरूणीच्या मृत्यूस जबाबदार नराधम गुन्हेगारांना कायदेशीर कठोर शिक्षा व्हावी. सदरची घटना अतिशय अमानवीय व निंदनीय असून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. याप्रकरणी संबंधित गुन्हेगारांना त्वरित फाशीची शिक्षा करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे मागणी केली आहे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार येईल, असा इशारा दिला आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष कुमार वाघमारे, दीपक जगधने, शिवाजी होवाळ, अमित गाडे, विक्रम ठोकळे, सचिन काटे, सुनील होवाळ, निलेश झिंगळे, ज्ञानेश्वर उबाळे, अक्षय गायकवाड, अरविंद होवाळ, दत्ता तोरणे, आप्पा रणदिवे, संजय चंदनशिवे, विनोद चंदनशिवे, मायाप्पा होवाळ यासह पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments