बार्शी व वैराग येथील जनावरांचे व शेळ्या, मेंढयाचे बाजार सुरु

बार्शी दि.१८(क.वृ.): कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी येथील शनिवारचा जनावरांचा व शेळ्या, मेंढ्या बाजार तसेच उपबाजार वैराग येथील बुधवार जनावरांचा व शेळ्या मेंढ्या बाजार चालू करण्यात येत असल्याचे बाजार समितीने जाहीर प्रसिद्धीकरण द्वारे कळविले आहे.
बाजार समितीने बार्शी शहर व तालुक्यातील शेतकरी व व्यापारी बांधवांना कळविले आहे की कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी मार्फत शनिवारी भरणारा बार्शीचा व उपबाजार वैराग येथील बुधवारी भरणारा जनावरांचा व शेळ्या मेंढ्या आठवडी बाजार सुरु करणेसाठी शासन आदेश परिशिष्ट क्र.२ महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई-४०००३२ यांचे आदेश क्र.डीएमयु/२०२०/सी.आर-९२/डी
0 Comments