अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे तातडीने पंचनामे करा मिरगणे यांची मागणी

बार्शी दि.१८(क.वृ.): तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकन्यांच्या उभ्या व काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाहौसिमचे माजी सहअध्यक्षा राजेंद्र मिरगणे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी मिरगणे म्हणाले तालुक्यात दि. १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील सोयाबिन, मुग, तुर, उडिद या उभ्या पिकांचे, फळबागांचे व काढून ठेवलेले पिक वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे या ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. तसेच ज्यांच्या घरात जिवित हानी झाली अशा व्यक्तिच्या कुटुंबियांना मदत देण्याची गरज आहे. तसेच मिरगणे यांनी शहरातील नियोजनशुज्य व निकृष्ट रस्त्याच्या कामामुळे तसेच गटारीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणेबाबत व रस्त्यांची सदोष कामे करणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून संबंधित न.पा. अधिकाऱ्यांवर कारवाई होउन फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाव्दारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे.
0 Comments