खिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या सोलापूर महिला जिल्हाध्यक्षपदी कांचन करे यांची निवड

घेरडी दि.१८(क.वृ.): आपली नियुक्ती अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष या पदावर करण्यात आली आहे. आपण संघटनेच्या उद्देशाप्रमाणे भारतीय पोलीस दलातील सर्व स्तरावरच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या समस्या आपल्या संघटनात्मक कार्यातून सोडविण्यासाठी सदैव तत्पर रहाल अशी अपेक्षा करतो. आपल्या पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा. अशा आशयाचे पत्र संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास बाबुराव इंदुरकर यांनी नंदेश्वर, ता.मंगळवेढा येथील कांचन बिरा करे यांना दिले आहे.
राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश एस इंदुरकर, राष्ट्रीय सचिव संतोष एम कुरुडे, महिला राज्य सचिव विद्या गडाख, सातारा महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी सुतार, सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन सुतार, सांगली जिल्हाध्यक्ष मकरंद सावंत यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments