Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीतुन भव्य ठोक मोर्चा

श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीतुन भव्य ठोक मोर्चा



तुळजापूर दि.९(क.वृ.):- महाराष्ट्राची कुलस्वामीनी छञपती शिवाजी महाराजांची वरदायनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीतुन भव्य ठोक मोर्चा नंतर राजेशहाजीमहाध्दार समोरील भवानी रोडवर संभळाचा कडकडाटात आई राजा उदो उदो ! छञपती शिवाजी महाराज की जृय या जयघोषात खा संभाजी राजेंचा उपस्थितीत गोंधळाची आरती करुन महाजागर होवुन सकल मराठा समाजाचा वतीने मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसऱ्या पर्वास शुक्रवार दि९रोजी आरंभ झाला. मराठ्यांना  आरक्षण मिळाल्या नंतरच हे   आंदोलन थांबेल असा इषारा वक्त्यांनी यावेळी दिला. आज तुळजाई नगरीत सर्वञ ऐक मराठा लाख मराठा! आरक्षण आमचा हक्काचे नाही कुणाचा बापाचे, देत कसे नाही घेतल्या शिवाय राहत नाही या घोषणांनी नगरी दणाणुन गेली होती ग्रामीण भागातील मराठा यात मोठ्या संखेने सहभागी झाले होते, तिर्थक्षेञ तुळजापूरात मराठा आरक्षण तिसरे पर्व पार्श्वभूमीवर. 

शुक्रवार सकाळी हलग्याचा कडकडाटात छञपती संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन या भव्य ठोक मोर्चास छञपती शिवाजी महाराज चौकातुन आरंभ झाला  भवानी रोड मार्ग हा मोर्चा  श्रीतुळजाभवानी राजेशहाजीमहाध्दार येथे आल्यानंतर येथे प्रथम पोवाड्याचा कार्यक्रम झाला नंतर  महाजागर कार्यक्रम झाला. शेवटी जागर गोंधळाची आरती संभाजी राजेचा हस्ते करण्यात आली व या कार्यक्रमाचा सांगता झाला. महाजागर कार्यक्रम नंतर मागण्यांचे निवेदन खा संभाजीराजेचे हस्ते देण्यात आले. 

यावेळी मार्गदर्शन करताना खा संभाजी राजे म्हणाले की मराठा समाजाचे आरक्षण टिकावण्यात सरकारने प्रयत्न कमी असुन  फारसे प्रयत्न सरकारकडून होताना दिसत नाहीत आता खरी लढाई खासदार आमदारांची लढाई सुरु झाल्याचे यावेळी म्हणाले आरक्षण व्यतिरिक्त इतर मागण्या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावेत असे यावेळी सरकारला आवाहन केले सरकार मध्ये समन्वय नाहीमराठा आणि ओबीसी समाजात जान्वपुर्वक दुही निर्माण केली जात आहे मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणातून आरक्षण नको आहेसारथी संस्था टिकू नये असे प्रयत्न सरकार मधले घटक करत आहेत, असा आरोप यावेळी केला बत्तीस टक्के लोकसंख्या असलैल्या समाजाचा विकासासाठी दीड हजार कोटी निधी द्यावा असे यावेळी म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी योग्य शब्द वापरले नाहीत अशी खंत व्यक्त केली. अजूनही सामाजिक आरक्षणाची गरज आहे लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसा फक्त कोरोनामुळे विरोधकेल्याचे सांगुन कोरोना कमी झाल्यावर परिक्षा घ्यावी पण आधीच्या नियु्कता का दिल्या नाहीत असा सवाल करुन राज्यातली आंदोलने भाजपा पूरस्कृत नाहीत असे यावेळी म्हणाले. आजी माजी मुख्यमंत्रींनी टीव्ही वर न बोलता समाजाशी बोलले पाहिजे असे स्पष्ट केले मराठा समाज बांधवांनी भावनिक न होता डोक्याने काम करुन संयम पाळुन हक्काचे मास्क घालुन  स्वताची काळजी घेत आंदोलन करावे असे यावेळी सुचवले मी कुण्याही पक्षाचा खासदार नाही कुण्या पक्षासाठी काम केले हे दाखवून द्यावे असे यावेळी म्हणाले आता मराठासमाजाने आंदोलनासाठी दुसरी फळी तयार करावे असे यावेळी आवाहन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments