Hot Posts

6/recent/ticker-posts

सेवांतर्गत आश्र्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले शासन निर्णय पुनर्जीवित करा कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूरचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन

 सेवांतर्गत आश्र्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले शासन निर्णय पुनर्जीवित करा कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूरचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन

सोलापूर दि.९(क.वृ.): सेवांतर्गत आश्र्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले शासन निर्णय पुनर्जीवित करा, असे निवेदन कॉलेज कर्मचारी युनियन  सोलापूरने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांना दिले आहे.

सेवांतर्गत आश्र्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले शासन निर्णय पुनर्जीवित करून मान्यता घेण्यासाठी आर्थिक भाराची माहीती शिक्षण संचालकांनी मागवलेली आहे. परंतु हे शासन निर्णय पुनर्जीवित केल्यास शासनास आर्थिक भार पडणार नाही. कारण आजही संबंधित कर्मचाऱ्यांना त्याच योजनेच्या अनुषंगाने शासन त्यांचे वेतन आजही देत आहे. त्यामुळे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी २०१९ चे शासन निर्णय पुनर्जीवित करावे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे निवेदन देताना  कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूरचे अध्यक्ष राजेंद्र गोटे, सरचिटणीस अजितकुमार संगवे, कार्याध्यक्ष राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष दत्ता भोसले उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments