Hot Posts

6/recent/ticker-posts

संत रोहिदास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

संत रोहिदास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर, दि.९(क.वृ.): सोलापूर जिल्ह्यातील अनूसुचित जातीमधील चर्मकार समाजातील (चर्मकारढोरहोलारमोची इत्यादी) गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना विविध व्यवसाय करण्यासाठी संत रोहिदास चर्मोद्योगचर्मकार विकास महामंडळाच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एम. पवार यांनी केले आहे.

चर्मकार समाजातील नागरिकांचे जीवनमान उंचविणेसमाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने संत रोहिदास चर्मोद्योगचर्मकार विकास महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. सोलापूर जिल्ह्यासाठी 2020-21 या वर्षासाठी व्यवसाय करणाऱ्यांना अनुदान योजनेचे 30 आणि बीजभांडवल योजनेचे 31 असे उद्दिष्ट आहे. या योजनांसाठी बँक सहभाग 75 टक्के, महामंडळ सहभाग 20 टक्के आणि लाभार्थी सहभाग 5 टक्के असणार आहे. समाजातील जास्तीत जास्त गरजूंनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.

योजनेच्या अटी :

  • अर्जदार अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • तो महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांपर्यत असावे.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावे.
  • (अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.98000/ व शहरी भागासाठी रु.120000/ पर्यंत असावे.
  • जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असावा.
  • अर्जदाराने महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  • महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील. 
  • अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.

अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे. अधिक माहितीसाठी संत रोहिदास चर्मोद्योगचर्मकार विकास महामंडळ मर्यादित, सोलापूर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला, शासकीय विश्रामगृहाच्या मागे, सात रस्ता, सोलापूर  दूरध्वनी क्रं. 0217-2316355, इमेल- lidcomsur@rediffmail.com येथे संपर्क साधावा.


Reactions

Post a Comment

0 Comments