शोभेच्या दारू विक्रीच्या परवान्यासाठी अर्ज करण्याची मुदत 20 ऑक्टोबरपर्यंत

सोलापूर, दि.९(क.वृ.): जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) दिवाळी सणासाठी शोभेच्या दारू विक्रीच्या (फटाके विक्री) तात्पुरत्या परवान्यासाठी 10 ऑक्टोबर 2020 पासून अर्ज करता येणार असून 20 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी केले आहे.
तात्पुरत्या परवान्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सेतू कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे उपलब्ध आहेत. परिपूर्ण माहिती भरलेले अर्ज सर्व कागदपत्रासह दुय्यम चिटणीस शाखा, जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे 20 ऑक्टोबर 2020 पर्यंत जमा करावेत. अर्जासोबत 500 रूपये चलनाने भरलेले परवाना फी, दोन फोटो, ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपरिषद यांचा ना-हरकत प्रमाणपत्र, 18 वर्षे पूर्ण झाल्याबाबतचा वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला), संबंधित जागेचा सातबारा उतारा आणि नकाशा आणि यापूर्वी काढलेल्या परवान्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. परवाने देण्यापूर्वी संबंधित पोलीस स्टेशनमार्फत चौकशी करण्यात येते.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार परवाने देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, अधिक माहितीसाठी दुय्यम चिटणीस शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे दूरध्वनी-02172731020, इमेल- dcbsolapur@gmail.com यावर संपर्क साधावा.
0 Comments