मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदनाची दखल घेऊन सावळेश्वर टोल नाक्यावरील रोख टोलच्या लेन वाढवून वहातूक केली सुरळीत

मोहोळ दि.१०(क.वृ.): सावळेश्वर टोल नाक्यावरील वाढती वाहनांची गर्दी आणि महामार्गावरील इतर समस्यांसंदर्भात माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार यशवंत तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. सावळेश्वर टोल नाक्यावर रोख टोलची एकच रांग होती रस्ता नादुरुस्त झाला आहे अनेक ठिकाणी सर्विस रोड नाही आदी बाबतच्या मागण्यांचे निवेदन मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ने दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर मोहोळ विश्रामगृहावर आज मोहोळचे दक्ष आमदार यशवंत माने यांनी युवा नेते अजिंक्यराणा पाटील, तहसीलदार जीवन बनसोडे, अध्यक्ष प्रकाश चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामार्ग प्रशासनाचे अधिकारी अनिल विपत आणि टोल व्यवस्थापनाचे अविनाश पाटील यांच्यासमवेत बैठक लावून यावर सविस्तर चर्चा केली. या निवेदनानुसार रोख टोल साठी एकच रांग होती परंतु दि.8 पासुन दोन रांगेची वाढ केली आहे यामुळे वाहनांची गर्दी कमी झाली आहे.तसेच नादुरुस्त रस्त्याला दुरुस्त करुन हायवेला व सर्विस रोड तातडीने दुरुस्त करून अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे आश्वासन टोलव्यवस्थापकांनी यावेळी दिले.
यावेळी महामार्ग संदर्भातील सर्विस रस्ते, दिवाबत्ती यासंदर्भातल्या महत्त्वपूर्ण बाबी आमदार यशवंत माने यांनी महामार्ग प्रशासनाच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून देऊन याबाबत त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.महामार्ग दुरुस्तीची कामे दर्जेदार करण्याच्या मागणी यावेळी अजिंक्यराणा पाटील यांनी आवर्जून केली. यावेळी माजी नगरअध्यक्ष रमेश बारसकर, नागेश साठे, ज्ञानेश्वर चव्हाण रामराजे कदम प्रशांत बचुटे इत्यादी उपस्थित होते.
0 Comments