Hot Posts

6/recent/ticker-posts

कोव्हीड-१९ च्या कार्यातुन शिक्षकांना कार्यमुक्त करा कृती समितीची आयुक्तांकडे मागणी

कोव्हीड-१९ च्या कार्यातुन  शिक्षकांना कार्यमुक्त करा कृती समितीची आयुक्तांकडे मागणी

सोलापूर, दि.१०(क.वृ.): महानगरपालिका हद्दीतील सेवा अधिग्रहीत केलेल्या  शिक्षकांना कोव्हीड-१९ च्या कामातुन कार्यमुक्त करा.अशी मागणी म.न.पा.आयुक्त यांच्याकडे खाजगी शाळा संयुक्त कृती समितीने केल्याची माहीती डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परीषदेचे प्रदेश सचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.

महाराष्टृ राज्य शाळा कृती समिती, डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषद, महाराष्टृ राज्य शिक्षक सेना, युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने मा.जिल्हाधिकारी व मा.म.न.पा.आयुक्त यांना हे निवेदन देण्यात आले.या निवेदनावर गुरुनाथ वांगीकर, विनोद आगलावे, अप्पासाहेब पाटील, अ.गफुर अरब व विरभद्र यादवाड यांच्या सह्या आहेत. १७ ऑगस्ट २०२० च्या शासननिर्णयानुसार शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत संबंधित शिक्षणाधिकार्‍यांनी शिफारस करुन शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे. असे आदेश शासन परापत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेअंतर्गत सर्व्हेक्षण करण्याबाबत शासन आदेशात शिक्षकांचा कोठेही उल्लेख करण्यात आला नाही. नगरसेवक, स्वयंसेवक, आशा कर्मचारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिक्षकांना या मोहिमेतर्गत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

काही आरोग्य केंद्रावर शिक्षकांना नाहक त्रास दिला जातो. ग्रामीण भागातील शिक्षकांना जिल्हाधिकार्‍यांनी कार्यमुक्त करण्याबाबत आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार महानगरपालिका हद्दीतील कार्यरत शिक्षकांना शासन आदेशाप्रमाणे तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे. असेही संघटनेच्या परिपत्रकात म्हंटले आहे. याबाबत शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments