Hot Posts

6/recent/ticker-posts

पाणी फाउंडेशनच्या तज्ञ मार्गदर्शकांचे सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रशिक्षण - सुशांत गायकवाड

पाणी फाउंडेशनच्या तज्ञ मार्गदर्शकांचे सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रशिक्षण - सुशांत गायकवाड

जामगाव व धानोरे येथे पार पडले उत्साहात प्रशिक्षण

माढा दि.१७(क.वृ.): पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेले तज्ञ मार्गदर्शकांचे प्रशिक्षण सध्या प्रोजेक्टरच्या सहाय्याने थेट माढा तालुक्यातील जामगाव व धानोरे येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य आणि पाणी फाउंडेशन टीमच्या सदस्यांना जल व मृदासंधारणासाठी देण्यात आले.

मागील दोन वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशनच्या वतीने गावोगावच्या निवडक सदस्यांना 4 दिवस बाहेरगावी जाऊन प्रत्यक्ष कृतीयुक्त अनुभवातून जलसंधारण व मृदासंधारणाविषयी निवासी प्रशिक्षण दिले जात होते परंतु सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात पाणी फाउंडेशनच्या तज्ञ मार्गदर्शकांचे प्रशिक्षण प्रत्यक्ष संबंधित गावात जाऊन प्रोजेक्टरच्या सहाय्याने विविध प्रेरणादायी व्हिडिओ क्लिप दाखवून दिले जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आदेशांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत हा उपक्रम सुरू आहे. 

याप्रसंगी पाणी फाऊंडेशनचे समन्वयक सुशांत गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा जामगावचे सरपंच सुहास पाटील, धानोरेचे सरपंच मोहन क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, पाणी फाउंडेशनच्या टीमचे सदस्य व ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.

या महत्त्वाच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेसाठी जलव्यवस्थापन, मृदा व जलसंधारण,पौष्टीक गवताचे संरक्षित कुरण क्षेत्र तयार करणे,वृक्ष आणि जंगलाची वाढ,मातीचे आरोग्य या 6 घटकांसाठी एकूण 500 गुण आहेत. याआधारेच तज्ञांची टीम प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यमापन करणार आहे व त्यामधून सर्वांधिक गुण प्राप्त होणारे गाव समृद्ध गाव म्हणून निवडले जाणार आहे तरी सहभागी गावातील पाणी फाउंडेशनच्या टीमने जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावा असे आवाहन माढा तालुका पाणी फाऊंडेशनचे समन्वयक सुशांत गायकवाड यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments