उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भोसे (ता. पंढरपूर) येथे जाऊन कै राजूबापू पाटील यांना श्रद्धांजली वाहिली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भोसे (ता. पंढरपूर) येथे जाऊन कै राजूबापू पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आणि पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले. अजित पवार हे आज तालुक्यातील महापूर आणि अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आले. यावेळी त्यांनी भोसे येथे जाऊन राजूबापू पाटील, महेश पाटील, अनंतराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. पाटील कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या सोबत आम भारत भालके, आ. बबनराव शिंदे, आ.संजय शिंदे गणेश पाटील, शेखर पाटील आदी उपस्थित होते. मागील महिन्यात जेष्ठ नेते खा. शरद पवार यांनीही भोसे येथे जाऊन जाऊन राजूबापूना श्रद्धांजली वाहिली होती तसेच पाटील कुटूबीयांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते.
0 Comments