उत्तर सोलापूरात पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची आ.यशवंत माने व जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पाहणी केली

मोहोळ दि.१७(क.वृ.): मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा, होनसळ, राळेरास सह अन्य भागात वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची व भागाची शुक्रवार (दि.१६) रोजी आ.यशवंत (तात्या) माने व जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बळीराम (काका) साठे यांनी भेट देवून पाहणी करून सर्वांचे १००% पंचनामे करणेस प्रातधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सुचना केल्या. संबंधीत विभागास सुचना दिल्या.
यावेळी पंचायत समिती सभापती रजनी भडकुंबे,राष्ट्रवादी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तडे,राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद, युवकचे अध्यक्ष बालाजी पवार, गटविकास अधिकारी शेख मॅडम, मनोज साठे, हरिभाऊ घाडगे, संतोष वाबळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नशीर जहागीरदार सह मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक सह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments