Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरामुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्याची मागणी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी केली

पुरामुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्याची मागणी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी केली


अकलूज दि.१७(क.वृ.): अतिवृष्टीमुळे व नदी ओढ्याला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्यांना आपत्ती व्यवस्थापन निधीतुन ताबडतोब मदत करणे बाबत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री पालकमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर  यांचेकडे डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी  मागणी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात १४ ऑक्टोबर पासुन पडत असलेला परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नदी ओढ्याला आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकर्याचे शेतपीक आणि अनेक शहरातील नागरिकांचे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात नुकसान झाले असून डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः या नुकसानीची पाहणी केली व जिल्ह्यातील जनसेवा संघटनेचे कार्यकर्त्यांनी या बाबत आपले भागातील पाहिलेल्या परस्थिती वरून जिल्ह्यातील शेती व शेतीमाल तसेच शहरातील मालमत्तेचे  नुकसान तात्काळ पंचनामे करावेत आणि या खरीप हंगामात सातत्याने नुकसानीस सामोरे जात असलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा लवकर निर्णय घ्यावाअशी मागणी या निवेदनात केली आहे. 

कोरोनाच्या महाभयंकर संकटाला तोंड देत असताना १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या परतीचा पावसामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतीचे प्रमाणात नुकसान झाले असून  काढणी योग्य व काढून ठेवलेल्या अनेक शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेकांची घरेदारे वाहून गेली आहेत. विशेषता हातावर पोट असणाऱ्या व मोलमजुरी करून जगणाऱ्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले असून त्यांच्या रोजच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अनेक  जणांचा बळी गेला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पशुधन वाहून गेले आहे.

अशा संकटसमयी आपण अध्यक्ष असलेल्या आपात्कालीन व्यवस्थापन समिती मार्फत जिल्ह्यत ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे अशा नुकसानीची तात्काळ चौकशी व पाहणी करून जागेवरच आपात्कालीन निधीमधून मदत  देऊन कोलमडून पडलेल्या शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.

तसेच या पावसामुळे  जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते, छोटे-मोठे पूल वाहुन गेले आहेत याची लवकरात लवकर दुरूस्ती करणे बाबती मागणी डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी  मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments