Hot Posts

6/recent/ticker-posts

पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहिर करा -अनिल केदार

 पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहिर करा -अनिल केदार  




सांगोला -(प्रतिनिधी) सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीचे,घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सांगोला  तालुक्याचे मनसेचे माजी तालुका अध्यक्ष अनिल केदार यांनी  केली आहे.                   

                                   सांगोला तालुक्यातील   शेतकरी यांच्या शेतीचे,पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान असेल तसेच माण,कोरडा व अप्रुपा नदीकाठावरील   गावे महापूराने बाधित होवून घरांची झालेली पडझड,दगावलेली अथवा पूरामध्ये वाहून गेलेली असंख्य जनावरे असतील अशा सर्व नूकसानग्रस्त शेतकर्यांचे,गोरगरीबांचे ताबडतोब पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी तसेच सरसकट 50 हजार हेक्टरी आर्थिक मदत करावी व ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी सांगोल्याचे मनसेचे माजी तालुका आध्यक्ष अनिल केदार यांनी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments