Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठल कुंभार यांना लायन्स भूषण पुरस्कार प्रदान

 विठ्ठल कुंभार यांना लायन्स भूषण पुरस्कार प्रदान




सोलापूर   (कटूसत्य वृत्त):-   लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल व शिवसरोज जनमंगल प्रतिष्ठान यांच्यावतीने दिला जाणारा मानाचा लायन्स भूषण पुरस्कार नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेचे  क्रीडा शिक्षक विठ्ठल कुंभार यांना प्रदान करण्यात आला. कोषाध्यक्ष ला.सी ए श्रेणीक शहा,अध्यक्ष ला. प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी,ला. दीनानाथ धुळम,ला.अरविंद कोणसिरसगी व लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते विठ्ठल कुंभार यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कुंभार यांच्या विद्याज्ञान व सामाजिक योगदान आणि अतुलनीय कार्यामुळे लायन्स भूषण पुरस्कार दिला जात असल्याचे अध्यक्ष कलशेट्टी यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments