Hot Posts

6/recent/ticker-posts

हाथरस प्रकरणातील आरोपीने फाशी द्यावी - मुस्लिम आरक्षण समन्वय समितीची मागणी

 हाथरस प्रकरणातील आरोपीने फाशी द्यावी - मुस्लिम आरक्षण समन्वय समितीची मागणी

सांगोला दि.७(क.वृ.): हाथरस येथील दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने देश हादरून गेला असून,या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र शाखा सांगोला यांच्यावतीने करण्यात आली आहे. मुस्लिम आरक्षण समनव्य समितीने संपूर्ण राज्यभर या संबंधी निवेदने दिली आहेत,त्याचाच एक भाग म्हणून सांगोला येथे मंगळवारी तहसील कार्यालयात हे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन श्री जुंदळे यांनी स्वीकारले.

सदर निवेदन देते वेळी  मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे तालुका अध्यक्ष मोहसिन तांबोळी, युवा नेते जाकीर तांबोळी,ओ बी सि शहर अध्यक्ष कादिर इनामदार,शिवाजीआबा मेटकरी,रावसाहेब मेटकरी, मोहसिन मुलाणी विजय शिंदे,राज मुलाणी यांचेसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments