पंढरपूर तालुक्यात निराधार योजनेची 34 प्रकरणे मंजूर

पंढरपूर, दि.७(क.वृ.): संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे 28 तर श्रावणबाळ योजनेचे 6 प्रकरणे असे एकूण 34 प्रकणे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.
निराधारांचे जीवन सुसह्य करण्यासासाठी त्यांना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. संजय गांधी निराधार योजनेमध्ये अपंग, निराधार, दुर्धर आजाराने पिडीत व्यक्ती तसेच श्रावणबाळ योजनेतंर्गत 65 वर्षावरील वृध्द निराधार व्यक्ती या योजनेचा लाभ घेवू शकतात. तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे एकूण 3 हजार 102 तर श्रावणबाळ योजनेचे 1 हजार 930 लाभार्थी लाभ घेत आहेत. या लाभार्थ्यांचे माहे ऑगस्ट 2020 पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याचे तहसिलदार वाघमारे यांनी सांगितले आहे.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या संबधित लाभार्थ्यांनी तातडीने अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बँक पासबुकाची छायांकित प्रत व फोटो तात्काळ पंढरपूर तहसिल कार्यालयात जमा करावा तसेच तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहनही तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी केले आहे.
0 Comments