Hot Posts

6/recent/ticker-posts

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षणावर भर द्या जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या प्रशासनाला सूचना

 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षणावर भर द्या जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या प्रशासनाला सूचना

 

सोलापूरदि.७(क.वृ.)अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आर्थिकसामाजिक उन्नतीबरोबर त्यांच्या शिक्षणआरोग्य आणि कौशल्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अल्पसंख्याक सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुखमनपा उपायुक्त जमीर लेंगरेकरप्रशासन अधिकारी कादर शेखमौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक चाँदमिया बिराजदारमनपाचे शिक्षणाधिकारीजिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षणाधिकारीसामाजिक न्यायउच्च व तंत्रशिक्षण, कौशल्य विकासपोलीसऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी अल्पसंख्याक विद्यार्थीयुवक यांच्यासाठी काम करीत असलेल्या शासकीय यंत्रणांचा आढावा श्री. शंभरकर यांनी घेतला.  शासन निर्णयानुसार मुस्लिमजैनशिखख्रिश्चन, पारशीज्यू आणि बौद्ध समाजाचा अल्पसंख्याकमध्ये समावेश होतो. अल्पसंख्याक विद्यार्थी आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध पातळीवर काम करीत आहे. शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य यावर काय उपाययोजना करता येतीलयावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बेरोजगार युवकांसाठी जास्तीत जास्त रोजगार मेळावे घेऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावायासाठी प्रचारप्रसार करण्याचाही प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. तसेच अल्पसंख्याक समाजातील धर्मगुरूंना भेटून त्यांनाही या कामात सामील करून घेतले तर शासनाला मदत होणार आहे.

शिक्षणसामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्तीवर भर देण्याबरोबर त्यांच्या सोयी-सुविधावर लक्ष देणे गरजेचे आहे. प्राथमिक, माध्यमिकमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करा. सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणीबाबतही लक्ष देऊन प्रकरणे निकाली काढावीतअशा सूचना श्री. शंभरकर यांनी केल्या.

मनपामध्ये शिष्यवृत्तीसाठी 7344 नोंदणीकृत विद्यार्थी असून 3408 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेतर्फे झाकीर हुसेन मदरसाचे पाच प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आले असून 38 मदरसे जिल्ह्यात आहेत. मात्र ते अनुदान घेत नसले तरी त्यांनी विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. त्याठिकाणी संगणकलॅबटॉयलेटबाथरूम आदी सुविधांची तपासणी करून कारवाई करा. व्यायामशाळाखेळाचे साहित्यविद्यार्थी संख्या वाढविणे, वसतीगृह उभारणीवर भर देण्याच्या सूचनाही श्री. शंभरकर यांनी केल्या. श्री. देशमुख यांनी पोलीस भरतीवसतीगृह अनुदानकर्ज प्रकरणेॲट्रॉसिटी याबाबत मार्गदर्शन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments