समृद्धी ट्रॅक्टर, पंढरपूर, सोनालिका कंपनीकडून २०१९-२० या सालामध्ये डबल धमाका ऑफरचे वितरण आज समृद्धी ट्रॅक्टर शोरूम पंढरपूर येथे संपन्न झाला


पंढरपूर (क.वृ.): या लकी ड्रॉ मध्ये 34 ग्राहकांचा समावेश होता, यापैकी जालिंदर शेळके (जाधववाडी) मोटर सायकल, बाळू सावंत (खरातवाडी), तयाब मुलाणी (मांजरी), रामचंद्र येडगे (महूद) १ग्राॅम गोल्ड कॉइन, मंगल ढोले (राझणी), अंकुश खटके (जुनोनी) यांना स्मार्टफोन,तर डिनर सेट बक्षिस सुनंदा तलावे (बटाण) विशाल पांढरे (पेनूर) या विजेत्यांना वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित माइंशा मसीहसर, मा आशुतोष सिंग, सुरेंद्र सिंह ठाकुर,संजय कारभारी तसेच समृद्धी ट्रॅक्टरचे मॅनेजर सोमनाथ केसकर, सेल्सटिम आदी उपस्थित होते.
प्रत्येक वर्षी नवनवीन योजना राबवून शेतकऱ्यांसाठी हिताचे काम समृद्धी ट्रॅक्टरच्या माध्यमातून करीत आहोत. सर्व शेतकरी बांधवासाठी यंदाची दिवाळी खास ठरणार आहे. प्रत्येक ट्रॅक्टर वरती इन्शुरन्स आणि पासिंग मोफत होईल, त्याचबरोबर सोनालीका ट्रॅक्टरची टायगर ही सिरीज विक्रीसाठी बाजारामध्ये उपलब्ध झाली आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आवडीचा आणि आपल्या दमदार कामाचा सोनालिका ट्रॅक्टर आजच बुकिंग करावा असे आव्हान डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांनी केल.
0 Comments