Hot Posts

6/recent/ticker-posts

बचत गट तसेच फायनान्स च्या सक्तीच्या वसुलीच्या विरोधात राष्ट्रवादी पक्ष कारवाई करणार- हनुमंत मांढरे

 बचत गट तसेच फायनान्स च्या सक्तीच्या वसुलीच्या विरोधात राष्ट्रवादी पक्ष कारवाई करणार- हनुमंत मांढरे


करमाळा (क. वृ.)ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले आहे परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हातातील काम गेल्या मुळे उपासमारी ची वेळ आली आहे त्यामुळे अशा  कर्ज घेऊन व्यवसाय चालू केलेल्या कर्जदारांच्या हिताचा निर्णय शासनाने घेतला आहे. जो पर्यंत कोरोना संकट संपत नाही तोपर्यंत आपली परिस्थिती नसेल तर कर्जाचे हप्ते भरू नये .या गटांच्या किंवा मायक्रोफायनांस च्या प्रतिनिधींनी वसुलीसाठी सक्ती केल्यास  त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी दिला आहे.

  याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी नमूद केले आहे की,ग्रामीण भागातील महिलांना काही बचत गटाचे हप्ते वसुली साठी नेमलेले एजंट बळाचा वापर करून धमकावून किंवा तगादा लावून जर कर्ज वसुली करत असतील तर ते महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेल्या आदेशाची व जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाची  पायमल्ली करत आहेत. त्यांच्या वरती त्वरित गुन्हे दाखल करण्यात येतील. असा प्रकार कोणत्या गावा मध्ये घडत असेल तर त्वरित संपर्क साधावा आसे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी केले आहे. सध्या करमाळा तालुका मध्ये बरेच असे अनेक मायक्रो फायनान्स कार्यरत आसून ते गरीब गरजू कष्टकरी शेतकरी महिला यांची बचत गटाच्या माध्यमातून लुट करत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य गोरगरीब कष्ट करी शेतकरी महिला बचत गट यांना जर हप्ते वसुली साठी कोणतेही फायनान्स तगादा लावत आसेल तर त्याची गय केली जाणार नाही. गोरगरीब कष्ट करी लोकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंभीर पणे उभा आहे. त्यामुळे आपणा वरती अन्याय होत असेल तर माझ्याशी संपर्क साधावा आसे आवाहन मांढरे-पाटील यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments