थैलेसेमिया रुग्णांकरीता श्री. छ.शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे औषधोपचार व मोफत औषधे देण्यास सुरुवात ; आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश
सोलापूर : थैलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, अनिमिया रक्तविकार हा अनुवंशिक आजार असल्यामुळे या रुग्णांना दर 15 ते 20 दिवसाला बाहेरून रक्त द्यावे लागते. सतत रक्त दिल्याने सदर रुग्णांच्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढते यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होते. यामुळे त्यांना सतत औषधांची आवश्यकता असते. परंतू सदरचे औषधे महाग असल्यामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहतो. यामुळे समवेदना मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे सोलापूर येथील श्री. छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये औषधे उपलब्ध करून देण्यात यावे याबाबत मागणी करण्यात आली होती.
यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी श्री. छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे थैलेसेमियाचे औषधे उपलब्ध करून दिले व सदर रुग्णांना श्री. छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे औषधोपचार व मोफत औषधे देण्यास सुरुवात करण्यात आली असून आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते औषधे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना रुग्णालयामध्ये डे केअर सेंटर सुरु करण्याकरीता मागणी केली. याबाबत डॉ. लहाने यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच डे केअर सेंटर सुरु करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच बालरोग चिकित्सक डॉ. सावसकर यांनी दर मंगळवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत औषधे मिळतील असे आवाहन केले. यावेळी डॉ. अग्रजा चिटणीस, डॉ. अविनाश घोरपडे, योगेश पवार, अॅड. भडंगे, प्रभाकर आयवळे, बालाजी गेजगे, विकास कांबळे, रोहन साठे, सतीश पोतदार, व बहुसंख्य रुग्ण व पालक उपस्थित होते. श्री. छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे थैलेसेमिया रुग्णांना औषधे मिळल्यामुळे रुग्णांच्या पालकांवर असलेला ताण-तणाव कमी झाला यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सदर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले आहे.
0 Comments