धावपटु पोतराजच्या मुलाच्या शिक्षणासाठी धडपड - मदतीचे आवाहन

अक्कलकोट दि.७(क.वृ.): पोतराजाच्या मुलांने शिक्षणाची कास धरून धावण्याच्या शर्यतीत राज्यस्तरापर्यंत धडक मारली.पण आर्थिक हालाखीच्या परिस्थिती मुळे खुराकच्या कमतरेमुळे पदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे आहे. स्वतः काम करून पोटाची खळगी सोबतच शिक्षण व खेळ सुरू ठेवण्यासाठी धडपड करणाऱ्या राज्यस्तरीय धावपटु लक्ष्मन तमण्णा कोळी याला मदतीची गरज आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही म्हणुन स्वतःच्या दोन मोठ्या भावाच्या मुलांसोबत मैदानावर घाम घाळुन भाकरीचा अर्धचंद्र शोधतानाही धावण्याच्या शर्यतीत मेडलचे स्वप्न पाहणाऱ्या या भटक्या कुंटुंबातील गुणी खेळाडुंना मदतीची गरज आहे.
लक्ष्मन कोळी हा यंदा अकरावीत असुन छत्रपती शाहु क्रीडा संकुल सातारा येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा क्रासकंट्री स्पर्धेत धडक मारलेल्या या गुणी खेळाडुचे परिस्थिती मुळे शिक्षण व सराव थांबला आहे.
वडिल तमण्णा पोतराज म्हणुन आयुष्यभर स्वतःच्या अंगावर कोडे ओढले तर आई गंगबाई मरगम्मा घेऊन गावोगामी हिंडत होती. नऊ मुले दोन मुली असे अकरा अपत्यामध्ये लक्ष्मन हा सर्वात लहान. आई वडिल आता वार्धक्याने थकले आहेत.वडिल आता ७५ वर्षाचे झाले आहेत. शेती नाही, घर नाही, वडिल एका गावावरून दुसऱ्या गावाला भटकंती करत होते. शेवटी आईवडिल अक्कलकोट स्थिरावले. वडिला सोबतच आई गंंगाबाई ची परवड होत गेली. नऊ भावंडे आहेत. सिंदूर्गप्पा, बापु, रमेश, स्वामी,यलप्पा, बाबु, अनिल, राम, आणि शेवटचा लक्ष्मन. फक्त राम आणि लक्ष्मन या दोघांनीच शाळेचे तोंड पाहिलेले. राम पदवी पर्यंत शिक्षण घेऊन पुण्याला कामासाठी गेलेला.सिंदुर्गप्पा, यलप्पा हे दोघे मोठे बंधु पोतराज चा पारपारिक व्यवसाय पुढे चालवत आहेत. घरात अठरा विश्व दारिद्रय. तरी पण या सर्वावर मात करत दहावी पर्यंत मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेमध्ये शिक्षण पुर्ण केलेले.अभ्यासात जेमतेम असल्याने खेळच मला तारू शकते या भावनेने दिवस दिवसभर घाम गाळत आहे. क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रनिंगचे दिवसरात्र सराव करण्यास सुरूवात केली. रेशन कार्ड नाही. जातीचा दाखला नाही. कोरोना मुळे बाहेर मागायला ही जाता आले नाही. त्यामुळे कित्येकदा उपासमारी झाली. भटकंती करत असल्याने स्थिर एक गांव नाही. याही परिस्थितीत लक्ष्मने आतापर्यंत तीन किमी स्पर्धेत नांदेड नववी असताना येथे क्रमांक मिळविले. ४०० मी खुला गटातुन नगर येथील स्पर्धेत क्रमांक मिळाला होता.
४०० मीटर धावाणे शालेय मैदानी स्पर्धे राज्यस्तर सातारा येथे क्रमांक मिळविले होते. सीएम चषक मध्ये प्रथम क्रमांक येऊन पाच हजार रूपयाचे बक्षिस मिळाले होते. जिथे दोन वेळचे खायला मिळत नाही तिथे डायट कसले. तरीही जिद्द व परिश्रम करून दररोज सकाळ संध्याकाळ मिळुन पाच तास सराव करतो. दुपारी घर चालविण्यासाठी पाण्याचे जार वाटपचे काम. घरी सारेच अशिक्षित. त्यामुळे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी विविध सामाजिक संस्था, व्यक्ती यांच्या कडुन मदतीची गरज आहे. मदत करावे असे आवाहन केले आहे. लक्ष्मन सोबतच त्याचा भावाचा मुलगा सुनिल सिंदुर्गप्पा कोळी व शंकरू बापु कोळी हे दोघेही मैदानावर घाम गाळत आहेत व शिक्षणाची कास धरली आहे. यांना मदत करण्यासाठी लक्ष्मण कोळी खाते क्रमांक ०७२२१०५१०००२६९६ आएएससी BKID0000722 बँक आँफ इंडिया चप्पळगांव यावर मदत करावे.
- लक्ष्मन कोळी धावपटु- आर्थिक परिस्थिती मुळे धावण्याचा सराव झाला की मी पाण्याचे जार वाटण्याच्या कामावर जातो. सराव करतो पण खुराक मिळाले तर नक्कीच देशासाठी मेडल मिळवु शकतो.
- प्रदीप राठोड-प्रशिक्षक-तीन वर्षापासुन यांना मोफत मार्गदर्शन करत आहे. लक्ष्मनचा स्टँमिना चांगला आहे. पण योग्य आहार मिळत नसल्याने त्याला म्हणावे तसे यश मिळत नाही.जर योग्य आहार मिळाले तर ते महाराष्ट्र व देशाचे नांव उज्वल करतील.विविध संस्था, संघटना, दानशुर व्यक्तीनी आर्थिक मदत करावे.
- तमण्णा कोळी वडिला पोतराज-रेशन कार्ड नसल्याने धान्यही मिळत नाही.आईच्या नावावर मागुन खात होतो.आता फिरणेही बंद झाले आहे.आयुष्यभर शरिरावर भरपुर कोडे ओढले. आता वाटते मुलांने शिक्षण घ्यावे.
- गंगाबाई कोळी-मागुन खाऊन खाऊन यांना शिक्षण दिले.आता आम्हाला वाटते आमच्या मुलांनी मागुन खाऊ नये.शिक्षण घ्यावे. यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी संस्था, शासन व दानशुर व्यक्ती कडुन मदत मिळाली पाहिजे.
0 Comments