मोहोळ मधील प्रभाग सोळा मध्ये ८२ लाखाच्या पाणीपुरवठा लाईनचे उदघाटन

मोहोळ दि.७(क.वृ.): ज्या भागातून आपण निवडून येतो त्या भागातील मूलभूत सुविधा सोडवण्याची जबाबदारी संबंधित लोकप्रतिनिधींची असते. विकास कामे करणाऱ्या नगरसेवकांची आणि त्यांच्या प्रभागातील जनतेची विकासाची घट्ट मगच नाळ जुळते.अशाच प्रकारे सुरुवातीपासून प्रभाग क्रमांक १६ च्या सर्वांगीण विकासासाठी या प्रभागाचे नगरसेवक सुशील भैय्या क्षीरसागर झटत आले आहेत.
त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे रस्ते पाणी आरोग्य वीज या सुविधा सोडवण्यासाठी या प्रभागाचे नगरसेवक तथा भाजपचे शहराध्यक्ष सुशील भैय्या क्षीरसागर हे सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहेत. यापुढील काळातही त्यांनी जास्तीत जास्त शासनस्तरावर पाठपुरावा करून प्रभागासाठी निधी आणून विकासाचा अपेक्षित टप्पा पूर्ण करावा असे आवाहन जिल्ह्याचे भाजप युवा नेते तथा लोकमंगल कारखान्याचे चेअरमन मनीष भैय्या देशमुख यांनी केले.
मोहोळ शहराच्या दक्षिण हद्दवाढ भागातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये पाणीपुरवठा लाईनसाठी तत्कालीन सहकार मंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा करून तब्बल ८२ लाख रुपयांचा निधी सुशील भैय्या क्षीरसागर यांनी खेचून आणला होता. या निधी मधील प्रत्यक्ष कामाचा कुदळ मारून शुभारंभ युवा नेते मनीष भैया देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मोहोळच्या नूतन नगराध्यक्षा शाहीन शेख, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, युवा नेते सोमेश आबा क्षीरसागर,जिल्हा चिटणीस सतीश पाटील,प्रभागाचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष सुशील भैय्या क्षीरसागर, अल्पसंख्याक भाजप तालुकाध्यक्ष मुजीप मुजावर, युवा मोर्चा उपाध्यक्ष अंकुश अवताडे, माजी जि.प. सदस्य नागेश मेजर क्षीरसागर, सिरसट गुरुजी, दिनेश गडदे , राजु सलगर, नंदुमामा बरकडे, राजाभाऊ खांडेकर, विशालभाऊ डोंगरे, सागर लेंगरे,प्रशांत गाढवे, नवनाथ चव्हाण इत्यादी सह प्रभाग क्रमांक सोळा मधील सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments