केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाची अंबलबजावणी राज्य सरकार करत नसल्याने आंदोलन करण्यात आले

सोलापूर, दि.७(क.वृ.): केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाची अंबलबजावणी राज्य सरकार करत नसल्याने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मोहोळ तहसील कार्यालयासमोर भाजपाच्या वतीने नूतन तालुका अध्यक्ष सुनिल चव्हाण यांच्या नेतृत्वा खाली आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मोठे पाऊल उचलले आहे परंतु यात राज्य सरकार आडकाठी करून राजकारण करत आहे. असे न करता हे विधेयक शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीनेलागू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान आघाडीचे नूतन उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी दिला. विधेयकाची अंमलबजावणी का करावी याची सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी नूतन तालुकाध्यक्ष सुनिल (दादा) चव्हाण मार्केट कमेटीचे माजी उपसभापती फंटू गोफणे, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनीही मनोगत व्यक्त केले. तहसीलदार जीवन बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी लोकसेवक संजय क्षीरसागर,जिल्हा चिटणीस सतीश पाटील, भाजपाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश सोवनी, पेनूरचे माजी सरपंच व सरचिटणीस रमेश माने, विष्णुपंत चव्हाण, शिरापूर (सो)चे माजी सरपंच प्रकाश काळे, श्रीकांत (महाराज) शिवपुजे, माजी पंचायत समिती सदस्य जगन्नाथ वसेकर, भारत आवारे, महेश धुमाळ, सरपंच चंदू भोई, महादेव जानकर, पैलवान भारत आवारे, श्रीकांत लांडगे, दीपक वसेकर, गणेश झाडे, मुजूप मुजावर, दीपक गवळी, नागराज पाटील, राजकुमार पाटील, लिंगराज निकम, आधी सहज तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments