Hot Posts

6/recent/ticker-posts

फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने दुर्मिळ होत चाललेल्या बेल वृक्षाचे रोपण

फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने दुर्मिळ होत चाललेल्या बेल वृक्षाचे रोपण

तुळजापूर, दि.७(क.वृ.):- तुळजापूर येथील फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने दुर्मिळ होत चाललेले वृक्ष रोपन आपसिंगा आरण्यात करण्यात आहे व हे वृक्ष वृक्षजतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प फाउंडेशन चा पदाधिकारीनी केला.

आपसिंगा येथील फॉरेस्ट मध्ये असलेल्या महादेव मंदिराच्या परिसरात कै.दुर्गेश भोसले यांच्या  स्मरणार्थ बेल वृक्ष जे कि श्रावण अधिक मासत पुजा अर्चा करताना बेलाचे तीन पाने आवश्यक लागतात व हे दुर्मिळ होत चालल्याने याचे  वृक्षारोपण करण्यात आले.

या बरोबर पुरातण  बेल, वड, पिंपळ वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच यापुढे ही या परिसरात आणखीन वृक्ष लागवड करण्यात येणार असून आज लावण्यात आलेल्या वृक्षांचे वृक्षपालकत्व स्विकारणार असल्याचे सज्जन जाधव कुणाल जाधव, शंभु सरडे, मयुर गुरव, आदर्श लोखंडे आनंद शिंदे रणजित मुळे यांनी घेतले. हा भाग अतिशय निसर्गरम्य असल्यानं या भागात नेहमीच विविध पक्षांचे अस्तित्त्व असल्यानं येथे नेहमीच पक्षांचा किलबिलाट ऐकायला मिळतो तसेच यापुढेही फौंडेशनच्या वतीने वन्यजीव पशू पक्षी हे निसर्गसौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यात येणार आहे यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे श्री सज्जन जाधव ,अजिंक्य नन्नवरे ,कुणाल जाधव , शंभु सरडे ,मयुर गुरव उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments