नथुराम गोडसेच्या विचारणांना तिरांजली देण्याचं काम ज्योती क्रांती परिषद करेल - श्री रमेश बारसकर

सोलापूर दि.३(क.वृ.): आजची परिस्थिती पाहता देशात अराजकता माजली की काय? असा प्रश्न उभा राहतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाचा नावलौकिक आहे,परंतु काही मनुवादी विचारसरणीकडून ह्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं जात आहे. रामराज्याच्या नावाखाली दडपशाहीचा वापर करून इथल्या जनतेवर जाणीवपूर्वक हुकूमशाही लादण्याचं काम केंद्रातील RSS च्या दावणीला बांधलेलं भाजप सरकार करत आहे.
गांधीला जन्म देणारा देश अशी भारत देशाची ओळख आहे परंतू आज या देशातून गांधींचा विचार कुठेतरी संपविण्याचे काम काही व्यक्तींकडून केले जात आहे.या देशाला गांधीला मारणाऱ्या नथुरामाच्या विचारांची गरज नसून राष्ट्रांला तरणाऱ्या गांधींच्या विचारांची गरज आहे. म्हणून नथुच्या विचाराला तिरांजली देण्याचं काम यापुढे ज्योती क्रांती परिषद राज्याभर करेल असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले *क्रांतीभवन* येथे म.गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ज्योती क्रांती परिषदेच्या तुळजापूर तालुक्याच्या निवडीच्या कार्यक्रमांप्रसंगी ते बोलत होते.
आज क्रांतीभवन मोहोळ येथे तुळजापूर तालुका युवक उपाध्यक्षपदी श्री गणेश माळी,तसेच तुळजापूर तालुका विध्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष सोमनाथ राऊत,तालुका सरचिटणीस म्हणून सचिन काळे,तर कार्याध्यक्ष किरण म्हेत्रे यांची निवड करण्यात आली.त्याच बरोबर दक्षिण सोलापूर युवक तालुका अध्यक्ष म्हणुन कु विश्वनाथ खारे यांना जबाबदारी देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या शुभहास्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन हार व फेटा घालून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी परिषेदेचे शिलवंत क्षिरसागर,अतुल क्षिरसागर,सागर अष्टुळ,तुळजापूर येथून उपस्थित असलेले मारुती रोकडे,लोमेश काळे,संभाजी गाजरे,सिद्धनाथ ढगे, नितीन माळी, गणेश माळी, विजय तरंगे, उमेश बारसकर, सिद्धार्थ एकमल्ले, गजानन टेळे आदीजण उपस्थित होते.
0 Comments