Hot Posts

6/recent/ticker-posts

शासनाने कलाकारांना आर्थिक मदत करावी - गोल्डमॅन संदीप गांधी

 शासनाने कलाकारांना आर्थिक मदत करावी - गोल्डमॅन संदीप गांधी

अकलूज दि.३(क.वृ.): अखंड जगात कोरोनाने कहर करीत थैमान घातले असून कित्येकांचे जीवन उध्वस्त केले आहे.अनेक उद्योग धंदे बंद पडले. अनेकांच्या हातचे काम गेले.कोरोनाचा कहर सुरू असताना काही नियम अटी लागू करून पुन्हा विस्कळीत झालेले जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना विविध प्रकारच्या कलाकारांनकडे मात्र दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र स्पष्ट आहे. जे कलाकार गरजू गरीब आहेत अशा कलाकारांना शासनाने आर्थिक मदत करण्याची गरज आहे असे मत सिनेअभिनेता गोल्डमॅन संदीप गांधी यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील तमाशा कलावंतअसो, लावणी कलावंत असो, बँड कलावंत असो, भारुड कलावंत असो, वाघ्यामुरुळी पार्टी कलावंत असो अथवा अन्य इतर सर्व प्रकारचे कलावंत अत्यंत गरजू व गरीब आहेत. यांचे सर्व कार्यक्रम बंद असल्यामुळे यांचेवर उपासमारीचे दिवस आले आहेत.सध्या हाताला मिळेल ते काम करीत ते उदरनिर्वाहसाठी संघर्ष करीत आहेत.अशा कठीण काळात संदीप गांधी यांनी अकलूज मधील काही कलाकारांना मदतीचा हात देत आधार देण्याचा प्रयत्न केला.परंतु शासनाने कलावंतांच्या कलाकारांच्या परस्थितीचा विचार करून त्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

स्वतः चा मेडिकल व्यवसाय सांभाळून संदीप गांधी यांनी अवंतिका मालिकेतून अभिनयाचा ठसा उमटवला.!पुढे त्यांना साई बाबा मालिका, कोण आहे रे तिकडे, मसुबा पावला नवसाला, शेवट एक सत्य कथा, अशा मराठी चित्रपटा बरोबरच सजदा या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. तर रोड माफिया शॉर्ट फिल्म, गोल्डमॅन व राडा अल्बम, ट्रीगल फोर वेन सिरीजमध्ये भरारी घेतली.अशा या उत्कृष्ट कलाकाराने कलाकारांच्या व्यथा शासन दरबारी मांडण्याचा प्रमाणितपणे प्रयत्न सुरू आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments