राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना भारतीय जैन संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले

सोलापूर, दि.३(क.वृ.): भारतीय जैन संघटनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना रेल्वे स्टेशन चौकातील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष केतन भाई शहा विभागीय अध्यक्ष शाम पाटील, जिल्हाध्यक्ष अभिनंदन विभुते, जिल्हा सचिव संजय भस्मे, संजय गडदे, आचार्य शांतिसागर, युवा संघाचे आनंद तलिकोटी, अजिंक्य बाल, सुरूप विक्रांत बशेट्टी, परीट व्यापारी असोसिएशनचे उमेश काटकर, महिला विभागाच्या स्नेहा वणकुद्रे, प्रिया पाटील, महेश आहेरकर, प्रशांत वर्धमाने, सर आकाश मगर उमखाणे, आदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. यावेळी केतन भाई शहा श्याम पाटील अभिनंदन विभुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वर्धमान सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय बसणे यांनी मानले.
0 Comments