कृषिकन्यांकडुन दुष्काळवर मात करणयास 'हायड्रोपोनिक्स' तंत्राचा वापर

सोलापूर, दि.३(क.वृ.): उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषी महाविद्यालय सोनई, येथील कृषिकन्या कु.प्रज्ञा महादेव काटवटे हिने 'हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती' या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. माती विरहित फक्त पाण्यावर चारा निर्मिती कशी करावी. त्याचबरोबर या चाऱ्यातील पोषक घटक व त्याचा दुग्धोत्पादनावर होणारा चांगला परिणाम याबद्दल उपयुक्त मार्गदर्शन केले.
चाऱ्यातील प्रथिनांचे प्रमाण उच्च असते.तसेच पाणी व जमिनीचा कमी वापर,कमी वेळात जास्त वाढ, उत्पादन खर्च कमी, उच्च प्रमाणात पोषणद्रव्ये व पूर्णपणे सेंद्रिय असल्याने ही अतिशय उपयुक्त व फायदेशीर चारा निर्मिती पद्धत आहे हे शेतकऱ्यांना पटवून दिले. यासाठी कृषी महाविद्यालय सोनई, चे प्राचार्य माननीय डॉ.एच.जी.मोरे सर व कार्यक्रम अधिकारी प्रा.शेडगे मॅडम तसेच प्रा.गायकवाड मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments