Hot Posts

6/recent/ticker-posts

'मुख्यमंत्रीजी, मद्यालये सुरू झालीत देवालये का नाहीत ?' - भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

'मुख्यमंत्रीजी, मद्यालये सुरू झालीत देवालये का नाहीत ?' - भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सांगोला दि.१३(क.वृ.): राज्यातील या तिघाडी सरकारमध्ये निर्णयांची एकवाक्यता नसल्यामुळे मंदिरे अद्यापही बंद ठेवून एक प्रकारे भाविकांची अडवणूक करत आहेत. धार्मिक स्थळे सुरू झाल्यामुळे सकारात्मक ऊर्जा व आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मन:शांती लाभणार आहे. दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देऊन महसूल गोळा करण्याच्या पाठीमागे लागलेल्या या सरकारला भक्तांच्या श्रद्धेकडे पाहण्यासाठी वेळ नाही. मद्यालये सुरू झालीत देवालये का नाही, असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

दार उघडा, उद्धवा दार उघडा, दारू नको भक्तीचे दार उघडा, उघडले मॉल्स, उघडली मद्यालये मुख्यमंत्रीजी कधी उघडताय आमची देवालये? अशा घोषणा देत  टाळ वाजवून सांगोल्यात भाजपच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. राज्यात मदिरा चालू असून मंदिर मात्र बंद आहेत, मंदिरे, धार्मिक स्थळे खुली करा, मंदिर बंद, उघडले दार, उद्धवा धुंद तुझे सरकार अशा घोषणांचे फलक घेऊन राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सांगोला शहरातील श्री अंबिकादेवी मंदिरासमोर उपोषणाप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, केंद्र सरकारनेही 4 जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहेत. महाविकास सरकारने राज्यातील नागरिकांना कोरोनाची भीती दाखवून मंदिरे उघडण्यास परवानगी दिली नाही. मंदिरे, देवस्थाने बंद असल्याने भाविकांना दर्शन मिळणे कठीण झाले आहे. अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव आला आहे. नवरात्रीच्या कालावधीत तरी मंदिरं खुली करण्याची राज्य सरकारनं परवानगी देण्याची मागणी केली आहे. राज्यात मंदिरे सुरु करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. मंदिरे बंद असल्याने हार-फुले विक्रेते, मिठाई व्यावसायिक, लहान मोठे व्यावसायिक यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. कोट्यवधी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यावर आघाडी सरकारने मंदिरे, देवस्थाने सुरू न केल्यास येत्या काळात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, शिवाजीराव गायकवाड, गजानन भाकरे, आनंद फाटे, तानाजी कांबळे, विलास व्हनमाने, प्रवीण जानकर, दत्ता टापरे, अमोल लऊळकर, मानस कमलापूरकर, डॉ.विजय बाबर, वसंत सुपेकर, अभिजित नलवडे, सूर्याजी खटकाळे, शंकर खरात, ओंकार देशपांडे, ओंकार कुलकर्णी, सुरेश इंगोले, विकास सावंत, अजित केदार, ओमकेश मिसाळ, सुनील पवार, परमेश्वर नलवडे, सत्यवान सरगर, सीताराम मेटकरी, बिरा मेटकरी, सचिन केदार, दीपक केदार, विकास केदार, प्रवीण केदार, सोनू केदार, श्लेषा कारंडे, सोयजीत केदार, मयुरेश गुरव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सांगोला भाजपच्या वतीने तहसीलदार व सपोनि प्रशांत हुले यांना निवेदन देण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments