अल्पसंख्याक उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा विविध 448 पदांसाठी भरती ; 29,30,31 ऑक्टोबर आणि 1,2,3 नोव्हेंबरला विशेष मेळाव्याचे आयोजन

सोलापूर, (क.वृ.): जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील बेरोजगारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 29, 30, 31 ऑक्टोबर आणि 1,2,3 नोव्हेंबर 2020 रोजी अल्पसंख्याक विशेष ऑनलाईन रोजगार मिळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी केले आहे.
लॉकडाऊननंतर शासनाने काही अटी व शर्तीच्या अधिन राहून कंपन्या/ औद्योगिक आस्थापना, व्यवसाय उद्योग सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. नव्याने व्यवसाय, उद्योग सुरु करताना जिल्ह्यातील आस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज निर्माण झाली असून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, सेल्स एक्झिकेटीव्ह, सर्व्हिस
इंजिनिअर,
कॉम्प्युटर ऑपरेटर, इन्शुरन्स ॲडव्हायझर, नर्सिंग
फार्मासिस्ट, ड्युटी मेडिकल ऑफिसर, सुपरवायझर, 10 वी
पास/नापास, 12वी, पदविका, पदवीधर,
पदव्युत्तर पदवी अशा प्रकारची एकूण 448 रिक्तपदे आहेत. यासाठी सात उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.
ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत
जास्त बेरोजगार उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.
0 Comments