Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला तालुक्यासाठी वीज वितरणची दोन नवीन उपविभागीय कार्यालये मंजूर करण्याची कार्यवाही सुरू-आ. शहाजीबापू पाटील

 सांगोला तालुक्यासाठी वीज वितरणची दोन नवीन उपविभागीय कार्यालये मंजूर करण्याची कार्यवाही सुरू-आ. शहाजीबापू पाटील            

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

 सांगोला (वार्ताहर) सांगोला तालुक्यासाठी वीज वितरण कंपनीचे जवळा व हातीद अशी दोन नवीन उपविभागीय कार्यालये मंजूर करण्याची कार्यवाही सुरू झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदरचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेश ऊर्जा खात्याचे प्रधान सचिव यांना दिल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
           सांगोला तालुक्यामध्ये वीज ग्राहकांची एकूण संख्या ८५ हजार इतकी आहे व नवीन वीज मागणी ग्राहक ९००० असून शासन नियमाप्रमाणे प्रत्येक ३०००० ग्राहकांसाठी एक उपविभागीय कार्यालय असणे गरजेचे आहे.परंतु तालुक्यामध्ये ८५००० वीजग्राहक असूनही सांगोला येथे एकच उपविभागीय कार्यालय असल्याने या कार्यालयावर कमालीचा कामाचा ताण पडत आहे.


          मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यामध्ये जवळा व हातीद या दोन ठिकाणी नवीन उपविभागीय कार्यालये मंजूर करण्याची मागणी केली होती. सदरची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित मान्य करून ऊर्जा खात्याचे प्रधान सचिव यांना याबाबतचा प्रस्ताव त्वरित शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिल्याने विज  वितरणची दोन नवीन उपविभागीय कार्यालये सांगोला तालुक्यासाठी मंजूर होण्याच्या कार्यवाहीस सुरुवात झाली आहे या नवीन दोन उपविभागीय कार्यालयामुळे वीज वितरण व संबंधित कामे सुरळीत होण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली...

Reactions

Post a Comment

0 Comments