Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला रोटरी क्लबच्या वतीने पोलिओ दिनानिमित्त कार रॅली संपन्न

 सांगोला रोटरी क्लबच्या वतीने पोलिओ दिनानिमित्त कार रॅली संपन्न


सांगोला (प्रतिनिधी)- जागतिक पोलिओ दिनानिमित्त शनिवारी सांगोला रोटरी क्लबच्या वतीने शहरातून कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. 
      जागतिक पोलिओ दिनानिमित्त दरवर्षी सांगोला रोटरी क्लबच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून 24 ऑक्टोबर रोजी सांगोला शहरातील प्रमुख रस्त्यावरून कार रॅली काढून पोलिओ संदर्भात जनजागृती करण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ महात्मा फुले चौकातून करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली महात्मा फुले चौकात परत आल्यानंतर  विसर्जन करण्यात आले.या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. महेश गवळी व सचिव रो. प्रविण मोहिते यांनी जागतिक पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी क्लब ने केलेल्या कार्याची माहिती दिली.  पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेऊन जागतिक पातळीवर कार्य करून भरीव असे योगदान दिले,असून रोटरी क्लब विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून यापुढेही रोटरी क्लब पोलिओ निर्मूलनचे कार्य करतच राहील अशी ग्वाही दिली. या रॅलीत रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.


   या वेळी रो.गोविंद माळी, रो.मधुकर कांबळे,रो.बाळासाहेब नकाते,रो.विजय म्हेत्रे,रो.नागेश तेली, रो.विशाल बेले,रो.प्रकाश महाजन,रो. मिलिंद बनकर, रो.विलास बिले, रो.निसार इनामदार, रो.हमीद शेख, रो.अशोक गोडसे, रो.डॉ.मच्छिंद्र सोनलकर, रो.राजेंद्र यादव, रो.सदाशिव पुजारी,रो प्रा पाटील सर आदि मान्यवर उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments