Hot Posts

6/recent/ticker-posts

" कटूसत्य इम्पॅक्ट " लऊळ गावचा प्रमुख भुयारी मार्गावरून वाहतुक सुरू

" कटूसत्य इम्पॅक्ट " लऊळ गावचा प्रमुख भुयारी मार्गावरून वाहतुक सुरू

लऊळ(कालीदास जानराव):- लऊळ ता.माढा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने गावचा प्रमुख रेल्वे भुयारी मार्ग गेल्या अकरा दिवसापासून वाहतुकीसाठी बंद होता.यामुळे वाहनधारकांना आपला जीव धोक्यात घालून रेल्वे मार्गाचा वापर करावा लागत होता. गावात येणारा हा एकमेव प्रमुख मार्ग असल्याने वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत दुर्लक्ष करीत होते. १९ ऑक्टोबर रोजी दैनिक कटुसत्यने रेल्वे प्रशासनाच्या गलथानपणामुळे लऊळ गावचा प्रमुख भुयारी मार्ग सात दिवसापासून बंद अशा आशयाची बातमी प्रसिध्द केली होती. सदर बातमीने झोपचे सोंग घेतलेले प्रशासन खडबडून जागे झाले.रेल्वे प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली.सलग तीन दिवसाच्या अथक परिश्रमानंतर पावसाच्या पाण्याने भरगच्च असलेला मार्ग मोकळा झाला.यामुळे वाहनधारकाना होणारा नाहक त्रास टळला.रेल्वे प्रशासन आणि दैनिक कटुसत्यचे वाहनधारक आणि ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments